Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात जागतिक जल दिन साजरा

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे जागतिक जल दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे दि.२१ रोजी ‘जागतिक जल दिन’ निमित्त शिबीर तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव व तालुका वकील संघ चाळीसगाव आणि पोदार इंटरनॅशनल स्कुल, चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले.

 

सदर शिबीरात सौ. प्रमिला पाटील, शिक्षिका पोदार इंटरनॅशनल स्कुल, चाळीसगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन केले. अॅड. हेमंत जाधव, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘जागतिक जल दिन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव  एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘जागतिक जल दिन’ निमित्त पाण्याचे महत्व, संरक्षण बचाव, प्रकिया, उपयोग व मानवाच्या जीवनाशी व निसर्गाशी त्याचा असलेला संबंध याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

 

सदर कार्यक्रमास  अजय घोरपडे, मुख्याध्यापक पोदार इंटरनॅशनल स्कुल, चाळीसगाव आणि इतर शिक्षकवर्ग कर्मचारी वृंद उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन डी.के.पवार,व.लिपीक व के.डी.पाटील यांनी पाहिले. सचिन हाळवे, व्यवस्थापक अधिकारी, पोदार इंटरनॅशनल स्कुल चाळीसगाव चाळीसगाव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.

Exit mobile version