Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात जनता कर्फ्यूला प्रतिसाद; शहरात कडकडीत बंद

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयानुसार तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला असून याला तिन्ही दिवशी उत्तम प्रतिसाद लाभला असून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

चाळीसगाव शहरात १ ते ३ मे या कालावधीत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. चाळीसगावकरांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने तिसर्‍या व शेवटच्या दिवशीही कडकडीत बंद पाळला. शहरातील हॉस्पिटल व दवाखान्यांमधील औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती. नागरिकांसह अन्य व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. शहरातील वर्दळीचे भडगावरोडसह, सिग्नल चौक, स्टेशनरोड, घाटरोड, नागद रोड, हिरापुररोड, सराफ बाजार, शिवाजी घाट, भाजी मंडई, कादरी नगर, हजरत अली चौक, पालिका मंगल कार्यालय, इस्लामपुरा उर्दू बालवाडी अशा वर्दळीच्या भागात रस्त्यावर कुणीही दिसून आले नाही.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version