Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात क्षुल्लक कारणावरून तरूणावर चाकुने वार

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | क्षुल्लक कारणावरून एका तरूणावर चाकुने वार करून गंभीर दुखापत केल्याची थरारक घटना आज सकाळी सातच्या सुमारास शहरातील आडवडे बाजारात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून या घटनेने चाळीसगाव हादरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील आडवडे बाजारातील अकबर शहा हैदर शहा (वय-२८) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला आहे. भंगाराचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवीत असतात. दरम्यान आज सकाळी ६:४५ ते ७ :२० वाजताच्या सुमारास घराजवळ भंगाराचे शेड बांधले या कारणावरून अकबर शहा हैदर शहा यांच्या पाठीवर चाकुने दोन वेळा वार केला. यात शहा यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ शहरातील खासगी दवाखान्यात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तत्पूर्वी शहरातील हरगीरबाबा नगरात एका तरूणावर चॉपरने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता पुन्हा या घटनेने संपूर्ण चाळीसगाव शहर हादरले आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी करीम शहा मासूम शहा (वय-४३) रा. आठवडे बाजार, चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात राजू भिकन मोरे, हरीष राजू मोरे, मयूर राजू मोरे व शुभांगी राजू मोरे सर्व रा. आठवडे बाजार, नागदरोड, चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि ढिकले हे करीत आहे.

Exit mobile version