Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात कापड दुकान फोडून रोकड लांबविली; गुन्हा दाखल!

चाळीसगाव,प्रतिनिधी| शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका कपड्याच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने १ लाख रुपये रोकड लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत वृत्त असे एकी, चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळ जय शंकर रेडीमेड ही कापड दुकान आहे. या दुकानात ठेवलेले १ लाख रुपये रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवार रोजी सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना शनिवारच्या रात्री १० वाजेपासून तर रविवार रोजी सकाळी ९:३० वाजेदरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. राजेंद्र शंकरराव वाघ रा. शनिमंदिर चाळीसगाव याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहे.

Exit mobile version