Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधांचे घरपोच मोफत वाटप

चाळीसगाव प्रतिनिधी । स्वर्गीय अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या व राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने चाळीसगाव तालुक्यामध्ये आपले मार्गदर्शक माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्यावतीने चाळीसगाव तालुक्यातील सर्व जनतेला ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधांचा घरपोच मोफत वाटप करण्यात येत आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये होमिओपॅथिक गोळ्या घरपोच मोफत वाटप केले. प्रभागचे नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सायलीताई जाधव, रोशन जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक बंटी ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते गौतम जाधव, शरद जाधव, बबलु जाधव, मनोज जाधव यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. नगरसेविका सायलीताई जाधव यांनी स्वत: प्रभातील प्रत्येक घरी जावून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधांचा घरपोच मोफत वाटप केले.

कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने केवळ रोग प्रतिकारकशक्ती वाढविणे हा एकच उपाय आहे. भारत सरकार आयुष मंत्रालया मार्फत कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरूद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणुन’आर्सेनिक अल्बम-३०’ औषध घेण्याचे सुचविण्यात आले आहे. स्वर्गीय अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या व राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने चाळीसगाव तालुक्यामध्ये आपले मार्गदर्शक माजी आमदार मा. राजीवदादा देशमुख यांच्या दातृवातून चाळीसगाव तालुक्यातील सर्व जनतेला होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले

Exit mobile version