चाळीसगावात “अक्षय तृतीयानिमित्त’ रंगली कुस्त्यांची दंगल

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्री. बळराम व्यायाम शाळेत “अक्षय तृतीयानिमित्त’ गुरूवारी रोजी भरविण्यात आलेल्या भव्य कुस्त्यांच्या दंगलीत पुणे येथील मल्लपटू गणेश जगताप यांनी दंगल गाजवून सोडला. व पहिला बक्षिसाचा मानकरी ठरला.

चाळीसगाव येथील श्री. बळराम व्यायाम शाळेच्या आवारात “अक्षय तृतीयानिमित्त’ गुरूवार रोजी जिल्हास्तरीय भव्य कुस्त्यांची दंगल भरविण्यात आली. श्री. रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळ, श्री. बळराम व्यायाम शाळा, श्री. हनूमान आखाडा, रांजणगाव व जय उत्तम वस्ताद व्यायाम शाळा, वाकडी यांच्या संयुक्त विद्यमाने हि दंगल आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी आखाडा पूजन सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल, सुधाकर राठोड, अण्णा गवळी, रावसाहेब पैलवान वाकडी, प्रभाकर चौधरी, सुभाष गायकवाड व वसंत चंद्रात्रे आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी व पैलवान अतूल पाटील (भारतीय रेल्वे) आदी उपस्थित होते.

या दंगलीत देशभरातील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. मात्र पुणे येथील मल्लपटू गणेश जगताप यांनी खरी दंगल गाजवली. आणि प्रथम क्रमांक पटकावून १ लाख ५१ हजार रुपयांचा बक्षिस पटकाविला. सदर इनाम सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल व सुधाकर राठोड यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तर दुसरे बक्षीस समिर शेख (जम्मू काश्मीर) यांनी मिळविला.

याप्रसंगी सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, जिल्हा दूध संघाचे प्रमोद बापू पाटील, रमेश चव्हान, महेंद्रसिंग पाटील, बाबा पवार, ज्येष्ठ पैलवान बाळाप्पा गवळी, अण्णा कोळी, रावसाहेब पैलवान, गुलाब पाटील, प्रभाकर चौधरी, मंगेश पाटील, बंटी ठाकूर, अण्णा गवळी, दिलीप कापडणे, भुरा शिंदे, आबा पाटील, दिनेश घोरपडे, गणेश गवळी, सदाशिव पैलवान, कैलास आगवणे, अभिमान पैलवान, सुपाजी गवळी, किरण गवळी, महादू गवळी यांच्यासह तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली.

Protected Content