Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावातून गाय चोरीला!

 

 

 

चाळीसगाव: : प्रतिनिधी ।  काही दिवसांपासून तालुक्यात गायी चोरीचे प्रमाण वाढलेले असताना  उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून  १७००० किंमतीची गाय चोरीला गेल्याचा  प्रकार उघडकीस आला  शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सद्दाम खान मुस्तान खान (वय-२८ रा. उर्दू बालवाडी समोर ,. चाळीसगाव )  परिवारासह वास्तव्यास आहेत. खान व्यापारी असून  १ मे रोजी सकाळी ७ वाजता त्यांची १७००० हजार रुपये किंमतीची  पांढऱ्या  रंगाची गाय उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आले

 

तालुक्यात  काही दिवसांपासून गायी चोरीचे सत्र  सुरू आहे. त्यामुळे चोरट्यांना पोलिसांची भिती राहिली नाही का? असा प्रश्न जनता विचारू लागली आहे. या चोरी प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास स . फौ .   अनिल अहिरे हे करीत आहेत.

Exit mobile version