Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावातील लाचखोर दोन्ही पोलिसांना चार दिवसाची कोठडी

जळगाव प्रतिनिधी । गांजाची केस दाखल न करण्यासाठी ८ हजाराची लाच स्विकारणारे सहायक फौजदार आणि पोलीस कॉन्स्टेबल या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने ४ दिवस (२७ मे पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

बापुराव फकिरा भोसले (५२,रा.चाळीसगाव, मुळ रा.आमडदे, ता.भडगाव) व कॉन्स्टेबल गोपाल गोरख बेलदार (३१, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर ह.मु.चाळीसगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री चाळीसगाव येथे ८ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. उपअधीक्षक गोपाल ठाकूर यांच्या पथकाने रविवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ मे पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.

Exit mobile version