Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावच्या शिक्षकाची निसर्ग संवर्धन व पर्यावरण संरक्षणासाठी धडपड

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणत वृक्ष तोड सुरू आहे. जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. रस्ते,नवीन वस्ती व इतर कारणांमुळे हजारो झाडांची सर्रास कत्तल केली जाते, मात्र तोडलेली झाडे पुन्हा लावण्यासाठी फार कमी लोक पुढें येतांना दिसतात. वृक्षांची संख्या वाढावी म्हणून चाळीसगांव मधील शिक्षक हेमंत भास्कर मोरे हे दोन वर्षापासून अनोख्या पद्धतीने प्रयत्न करत आहे.

 

हेमंत मोरे यांनी चाळीसगांव शहरात सीड बॉल कॅम्पेंन सुरू केले असुन, यात त्यांनी शहरातील निसर्ग प्रेमींनी एकत्र आणात मागील वर्षी दहा हजार सीड बॉलचे रोपण शहरात व लगतच्या अभयारण्यात त्यांनी केले आहे. या वर्षी देखील पंधरा हजार सीड बॉल बनवायचा व रोपण करण्याचा त्यांचा व कॅम्पेंन मधील सदस्यांचा मानस आहे.

 

या कॅम्पेंनमध्ये विद्यार्थी, शेतकरी, कामगार, नोकरदार, निसर्गप्रेमी सामील झाले आहे व सीड बॉल च्या माध्यमातुन वृक्षांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शहरातील काही नागरिकांनी आपल्याकडील झाडांच्या बिया व छोटे रोपटे कॅम्पेंनच्या सदस्यांना देत यात सहभाग नोंदविला आहे. झाडांचे अनेक फायदे आपण सर्व जाणतात म्हणून यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची आवश्यकता आहे. म्हणून असे कॅम्पेंन सर्वत्र राबविले गेले पाहिजेल अशी इच्छा शिक्षक हेमंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version