Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाच्या लोक अदालतीत पंधराशेच्यावर प्रकरण निकाली

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत पंधराशेच्यावर प्रकरण निकाली काढण्यात आले असून यावेळी अडीच कोटींच्या जवळपास रक्कम वसूली करण्यात आली आहे.

दिवाणी व फौजदारी न्यायालयात मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव व वकिल संघ चाळीसगाव यांचे सयुक्त विद्यामानाने चाळीसगांव न्यायालयात वादपुर्व प्रकरणांच्या कर्ज व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या वसुली करीता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव  एन. के. वाळके, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगाव  एस.डी. यादव, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगांव  एस.आर.शिंदे, अध्यक्ष वकीलसंघ चाळीसगाव अॅड. पी.एस.सोनवणे, उपाध्यक्ष वकीलसंघ चाळीसगाव अॅड. एच.एल.करंदीकर, सचिव वकीलसंघ चाळीसगांव अॅड. जे.एस.सैय्यद, सहसचिव वकीलसंघ चाळीसगांव, अॅड. बी.आर.पाटील, खजिनदार वकीलसंघ चाळीसगाव एन.एम. लोडाया तसेच पॅनल मेंबर्स अॅड. एल.एच.राठोड, अॅड. रविंद्र लांडगे, अॅड. माधुरी बी. एडके व न्यायालयीन कर्मचारी,  डी.के. पवार,  महेंद्र साळुंखे,  डी. टी. कु-हाडे, किशोर पाटील यांनी लोकन्यायालयाची कामकाज पुर्ण केले.

सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल पुर्व ७ हजार पाचशे ५३ इतके प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार पाचशे ९१ इतके प्रकरणे निकाली काढण्यात येवुन त्याबाबतची वसुली रक्कम रु.१०३३५१२१/- इतकी करण्यात आली. त्याच प्रमाणे चाळीसगांव न्यायालयातील एकुण दाखल असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे १२९९ पैकी ९६ इतके निकाली काढण्यात आले. त्या बाबतची वसुली रक्कम रु.१४३९७२२०/- इतकी करण्यात आली. अशाप्रकारे एकुण निकाली प्रकरणे १६८७ व एकुण वसुली रक्कम रुपये २४७३२३४१/- करण्यात आली.

तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव  एन. के. वाळके, यांनी म. गटविकास अधिकारी, पंचायत समिती चाळीसगांव, सर्व सहा. अभियोक्ता चाळीसगांव, सर्व बॅंक अधिकारी, नगर पालिका अधिकारी, म.रा.वि.म. अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीतेसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

Exit mobile version