Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चार वर्षानंतर गावात पुन्हा बस धावली

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आडगाव येथे मागील३० वर्षांपूर्वी सुरू झालेली आडगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी बससेवा पुर्वीप्रमाणे सुरू झाल्याने परिसरातील विद्यार्थी पालकांसह ग्रामस्यामध्ये आनंद व्यक्त येत आहे.

जळगावहुन येणारी व आडगाव कासारखेडा, चिंचोली, उटांवद मार्गावर चालणारी बससेवा ही मागीत चार वर्षांपासून बंद होती त्यामुळे आडगाव,कासारखेडा,चिंचोली व उंटावद येथील शिक्षणासाठी जळगाव जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयी व अडचणींचा सामना करावा लागत होता.

या संदर्भात उंटावद तालुका यावल ग्रामपंचायतच्या कार्यालयामार्फत यावल आगाराला बससेवा सुरू करावी याकरीता वेळोवेळी पाठपुरावा करून पत्रव्यवहारही केला जात होता मात्र नुकतेच यावल आगारात नुकतेच कायमस्वरूपी रूजु झालेले आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी उंटावद,चिंचोली,आडगाव व कासारखेडा येथील ग्रामस्थांच्या समस्या समजुन घेत शनिवार दि.२१ पासून ही बस सेवा पुन्हा सुरू केली आहे. चार वर्षानंतर सुरू झालेल्या या बस सेवेचे उंटावद येथे पुजन करून स्वागत करण्यात आले.

यावेळी सरपंच छोटू भगवान भिल, विविध कार्येकारी सोसायटीचे चेअरमन शशीकांत (शशी आबा) गुलाबराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य डीगंबर धना सपकाळे, दत्तात्रय ताराचंद पाटील, बसचालक व्ही.बी. साळुंके, वाहक व्ही.बी.पाटील, दिनकर देवराम पाटील, विकास विवेक पाटील, माधव गिरधर पाटील, समाधान त्रंबक पाटील इ.सह ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थीत होते. आडगाव जळगाव उंटावदमार्गे बससेवा सुरू झाल्यामुळे उंटावदसह आडगाव, कासारखेडा व चिंचोली येथील ग्रामस्थांनी यावल एसटी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांचे विशेष आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.

Exit mobile version