Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चार दिवस अमेरिकेत जाऊन घ्या कोरोनाची लस !

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईतील एका टुरिझम कंपनीने लोकांसाठी अमेरिकेत ‘व्हॅक्सिन टुरिझम’ची ऑफर दिली आहे. अमेरिकेत चार दिवस राहून करोना व्हायरसवरील लस घेता येईल, अशी ही ऑफर आहे.

भारताकडे पुढील वर्षापर्यंत व्हॅक्सिन उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, अमेरिकेत डिसेंबरअखेरपर्यंत लस उपलब्ध होईल असं सांगितलं जात आहे.

मुंबईतील Gem Tours & Travels ने व्हॅक्सिन टुरिझमची ऑफर आणली असून या ऑफरअंतर्गत लोक अमेरिकेत जाऊन लस घेऊ शकतात. कंपनी डिसेंबर महिन्यात अमेरिकेला जाण्यासाठी आकर्षक अशा पॅकेजची ऑफर देत आहे. लस घेण्यासोबतच अमेरिकेत 4 दिवस राहताही येईल. यासाठी 1 लाख 74 हजार 999 रुपयांच्या पॅकेजची घोषणा कंपनीने केली आहे. पॅकेजमध्ये मुंबईहून न्यूयॉर्कच्या विमान प्रवासाचं भाडं, हॉटेलमध्ये तीन रात्र आणि चार दिवस राहण्याची सोय, सकाळचा नाश्ता आणि व्हॅक्सिनचा एक डोस यांचा समावेश आहे.

“आम्ही व्हॅक्सिन टुरिझम विकसित करत आहे. आमच्याकडे व्हॅक्सिन नाहीये किंवा आम्ही ते खरेदीसुद्धा करत नाही. सर्व अमेरिकेच्या कायद्यानुसार होईल. कशाप्रकारे अमेरिका व्हॅक्सिन उपलब्ध करून देते याचीही माहिती दिली जाईल. पण आम्ही कोणत्याही प्रकारे अॅडव्हान्स किंवा डिपॉझिट घेत नाहीये. रजिस्ट्रेशनसाठी केवळ नाव, ईमेल, मोबाइल नंबर, वय, आजाराची माहिती आणि पासपोर्टची कॉपी घेतली जात आहे.

पुढील प्रक्रिया अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या परवानगीनुसार पूर्ण करण्यात येईल”, असं म्हटलं आहे.अमेरिका जोपर्यंत अधिकृतपणे अमेरिकी नागरिकांशिवाय अन्य लोकांना व्हॅक्सिन देण्याची घोषणा करत नाही तोपर्यंत आम्हीही व्हॅक्सिन देऊ शकत नाही, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Exit mobile version