Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्पिड ब्रेकरजवळ दुचाकीचा वेग कमी करत असतांना मागून चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना चोपडा रोडवरील मारूती मंदीराजवळ घडली आहे. याप्रकरणी चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिलींद अशोक पवार आणि त्याचा मित्र वसिम खान युसूफ खान पठाण हे दोघेजण शनिवारी १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईडी ८१७७) ने टीव्हीएस शोरूमवर जात असतांना रस्त्यावर स्पीड ब्रेकर आला. त्यावेळी दोघांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याच वेळी मागून येणारी चारचाकी कार क्रमाक (एमएच ०२ बीडी ९१६३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील वसीम खान पठाण हा जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर चारचाकी चालक वाहन घेवून पसार झाला. दुचाकीवरून दोघांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारवरील अज्ञात चालकाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल हाटकर करीत आहे.

Exit mobile version