Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाकू भोसकून खून करणाऱ्या तीन संशयितांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फटाके फोडण्याच्या कारणावरून शिरसोली नाका येथे तरूणावर चाकूने वार करून खून करणाऱ्या फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता तांबापूर परिसरातून अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिरसोली नाका परिसरातील सदगुरू कॉलनीत २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले. त्यानंतर मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, सतकौर जगदीशसिंग बावरी, सोनुसिंग जगदीशसिंग बावरी सर्व रा. शिरसोली नाका,सदगुरु कॉलनी जळगाव यांनी वाद घातला. यात संतापाच्या भरात मोहनसिंग बावरी, मोनुसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी यांनी मिळून संजयसिंग प्रदीपसिंग टाक याच्या पोटावर चाकूने वार करून खून करत दगडफेक केली. खून झाल्यापासून संशयित आरोपी हे फरार झाले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीसांनी कोंबींग ऑपरेशन राबवून संशयित आरोपी मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी या तिघांना तांबापूरा परिसरातून अटक केली असून न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version