Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाकूने वार करून जखमी करत तरूणाच्या हातातील मोबाईल लांबविला; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मानराज पार्कजवळ पायी जाणाऱ्या तरूणावर अज्ञात दोन जणांनी चाकूने वार करून जखमी करत हातातील मोबाईल हिसकावून पसार झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अविनाश राजेंद्र सोनवणे (वय-२४) रा. बांभोरी ता. धरणगाव जि.जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अविनाश सोनवणे हा आपल्या कुटुंबियासह बांभोरी येथे वास्तव्याला आहे. शहरातील मानराजपार्क समोरील नवजिवन शुपर शॉपच्या बाजूला राहणारे सुशिल साळुंखे यांच्याकडे वाहनचालक म्हणून नोकरीला आहे. १४ फेब्रुवारी रोजी अनिवाश दिवसभर ट्रीप करून सायंकाळी मालकाकडे रात्री १०.३० वाहन लावले आणि घरी जाण्यासाठी पायी निघाले. त्यावेळी मानराज पार्कजवळील दिलासा व्यसनमुक्ती केंद्रासमोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोनजण दुचाकीने आले. हातातील मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसवल्याने अविनाश यांनी मागे बसलेल्या तरूणाला लागलीच पकडले. यातील एकाने चाकू काढून अविनाश यांच्यावर वार करून जखमी केले. व दोघे दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

Exit mobile version