Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाकूचा धाक दाखवत विद्यार्थ्यांकडून घेतली ५ हजाराची खंडणी

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नुतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांला चाकूचा धाक दाखवत ५ हजाराची खंडणी घेतल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १९ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जयदीप राजेंद्र कछवा (वय-२२, रा. धाडरी ता.जि.धुळे, हल्ली मुक्काम गांधीनगर, रोटे हॉस्पिटल समोर जळगाव) हा तरुण शिक्षणासाठी जळगाव शहरात राहत आहे. सोमवारी 19 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सुनील प्रकाश खोंडे रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव याने नूतन मराठा महाविद्यालय परिसरात येवून जयदीप कच्‍छवा या तरुणाला चाकूच्या दाखवत त्याच्याकडून सुरूवातील दीड हजार रूपये घेतले. त्यानंतर पुन्हा चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. पुन्हा तरूणाला जीवेठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडून साडे तीन हजार रूपये असे एकुण ५ हजार रुपये जबरी काढून घेतले आहे. हा प्रकार घडल्यानंतर जयदीप कच्‍छवा याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री ११ वाजता संशयित आरोपी सुशील प्रकाश कोंडे रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय सोनार करीत आहे.

Exit mobile version