Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाइल्ड हेल्पलाईनवर ४० टक्के ‘मौन’ कॉल!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर आलेल्या कॉलपैंकी ४० टक्के कॉल ‘मौन कॉल’ असतात. कॉल केल्यानंतर पीडित व्यक्ती आपली तक्रार किंवा दु:ख व्यक्त करताना केवळ मौन बाळगतो. २०१८ पासून आत्तापर्यंत आलेल्या कॉल्सचा हा आकडा आहे.

अनेक पीडित व्यक्ती मदतीसाठी ‘मौन’ आळवणी करताना आढळतात. शोषण किंवा हिंसेबद्दल इतरांना सांगण्यासाठी पीडित व्यक्तींचं साहस कमी ठरतं. ‘मौन कॉल’मध्ये कॉल करणारा व्यक्ती काहीच बोलत नाही परंतु, त्याच्यामागून अनेक आवाज येतात.

चाइल्डलाईननुसार, जानेवारी २०१८ पासून यावर्षी सप्टेंबरपर्यंत एकूण २.१५ कोटी कॉल आले. यातील ८६ लाख ‘मौन कॉल’ होते.

वास्तवात मदत हवी आहे परंतु, बोलण्यासाठी धाडस होत नाही, असा या कॉल्सचा बऱ्याचदा अर्थ असतो. त्यामुळे, असे कॉल आम्ही कधीही मध्येच थांबवत नाही. बऱ्याचदा स्टाफ सदस्यांनी विश्वासात घेतल्यानंतर व्यक्ती बोलण्यास सुरुवात करते, तीन वर्षांत ‘मौन कॉल’ कमी झाले आहे.

आकड्यानुसार, २०१८ मध्ये १.०१ कोटी कॉल आले होते, यातील ४२ लाख म्हणजेच ४२ टक्के कॉल ‘मौन कॉल’ होते. २०१९ मध्ये एकूण ६९ लाख कॉल आले त्यातील २७ लाख अर्थात २९ टक्के कॉल याच पद्धतीचे होते. २०२० साली सप्टेंबर महिन्यापर्यंत एकूण ४३ लाख कॉल आले यातील १६ लाख म्हणजेच ३६ टक्के ‘मौन कॉल’ होते.

Exit mobile version