Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चांभार्डी येथील अल्पवयीन मुलाला फुस लावून पळविले

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चांभार्डी १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, पवन शिवलाल जगताप (वय-१५ रा. चांभार्डी ता.चाळीसगाव) याला २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान चाळीसगाव येथील सिद्धिविनायक मेडिकल जवळून एका अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे. त्यामुळे याबाबत वडील शिवलाल रंगराव जगताप ( रा. चांभाडी ता.चाळीसगाव) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात २७ मार्च रोजी २:५५ वाजता अज्ञात इसमाविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. यावेळी वडील शिवलाल रंगराव जगताप यांनी माझ्या संमतीवाचून अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे नोंद केले. यावरून पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.

Exit mobile version