Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चांदसर येथे जुन्या वादातून तरूणाला लाकडी दांडक्याने मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चांदसर गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चांदसर गावात जावेद किरण पिंजारी (वय-२२) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतात ४ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा अनिल सुरेश कोळी याने शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत दुखापत केली. तसेच जावेद पिंजारी यांच्या दुचाकीचे देखील नुकसान केले. जखमी झालेल्या जावेदला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी किरण पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता संशयित आरोपी अनिल सुरेश कोळी यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहे.

Exit mobile version