Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चांदवड टोल नाक्याजवळ गुरूद्वारातर्फे दररोज पायी जाणाऱ्या नगरिकांना अन्नदान

चांदवड प्रतिनिधी । मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोल नाका येथील मंगरूळ गुरूद्वारा येथे मुळगावी जाणाऱ्या नागरिकांसाठी लंगर (जेवण) सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी दररोज किमान ३ हजार नागरिक जेवण करतील अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रा. उदय वायकोळे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले.

चांदवड शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात डाळ, तांदूळ, गहू, तथा किराणा माल अनेक दानशूर दान करत आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून विविध जाती धर्मातील लोक सढळ हाताने मदत करीत आहेत, गुरुद्वारामधून लंगर (जेवण)चा लाभ घेऊन परप्रांतीय नागरिक पुढील वाट धरत आहेत. गुरुद्वाराचे रविंद्र मंजाल बाबा, सुखादीप रॉय, जगदेव सिंग रॉय, बंटीशेठ मेहता, सोनू घंडीयाल यांचे दिवसरात्र सहकार्य लाभत आहे. मनमाड येथील गुरुद्वाराचे बाबा रणजितसिंग यांच्या प्रेरणेने हे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे. त्या भागात अपघात वा अनुचित प्रकार घडला तर तेथील लोक सहकार्यासाठी लगेच धावून येत असतात. भुसावळच्या काही डॉक्टरांचा ६ वर्षांपूर्वी अपघात झाला होता तर गुरुद्वारातील लोकांनी खूप मनोभावे मदत केली होती. रखरखत्या उन्हात पायी जाणाऱ्या मजुरांची चांदवड येथे भूक भागविली जात असल्याने अनेकांकडून कौतुक देखील होत आहे.

Exit mobile version