Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चर्चेत उद्धव ठाकरे , अजित पवार , अशोक चव्हाण एकत्र हवेत — खासदार संभाजीराजे

 

 

कोल्हापूर : वृत्तसंस्था । अजित पवार , मुख्यमंत्री, अशोक चव्हाण एकत्र असतील तेव्हा आपण नक्कीच चर्चेला येऊ अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

 

आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती या अजित पवार यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात  झाली

 

उपमुख्यमंत्री अजित पवार काल माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, संभाजीराजेंनी आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करायला हवी होती. मात्र आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. ते जरुर करावं फक्त कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेऊन करावं. याला उत्तर देताना आज संभाजीराजे म्हणाले, अजितदादांचा मला फोन आला होता. मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला भेटून समाजाच्या मागण्या तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. त्यावर तुम्ही चर्चा करावी. आणि जेव्हा तुम्ही, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण सगळे एकत्र असाल तेव्हा मला बोलवा. मी येईन.

 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी समाजाला सांगितलं आहे.

 

Exit mobile version