Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चक्कर येऊन पडल्याने शेतमजुराचा मृत्यू

majur

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली शिवारातील शेतात कामाचा गेलेल्या चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

यासंदर्भात मिळालेली पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यावल तालुक्यातील अट्रावल येथे राहणारे संतोष भास्कर सोनवणे (वय ४५ वर्षे ) हे आज दिनांक २३ रोजी कोरपावली येथील शेतकरी प्रमोद यशवंत नेमाडे यांच्या कोरपवाली शिवारातील शेतात कामानिमित गेले होते. सकाळी अकराच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर येऊन घाम आल्याने ते जमीनीवर खाली कोसळले. त्यांना त्यांच्या सहकार्‍यांनी उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषित केले.

याबाबत मनोहर दशरथ सोनवणे ( रा. अट्रावल ) यांनी यावल पोलीस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सिकंदर तडवी व संजय देवरे हे करीत आहेत. यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डॉक्टर प्रल्हाद पवार यांनी मयताचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपविले आहे मयत संतोष सोनवणे याच्या कुटुंबात आई पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असे कुटुंब असुन मयत संतोष सोनवणे हा भास्कर सोनवणे यांच्या कुटुंबात एकमेव कमविता पुरूष असल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version