Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चंद्रप्रभा सोसायटीतून व्यापाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चंद्रप्रभा सोसायटीच्या परिसरातून व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजात  जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील चंद्रप्रभा सोसायटीत चंदन वासूदेव महाजन हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १६ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची दुचाकी (एमएम १९ डीडी ७११८) ही पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. रात्री १०.३० दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवारी २१ मार्च रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.

Exit mobile version