Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चंद्रपूर : लैंगिक अत्याचारातून १३ वर्षीय मुलगी गर्भवती

चंद्रपूर (वृत्तसंस्था) बल्लारपूर शहरातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी लैंगीक अत्याचारानंतर गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

 

बल्लारपूर शहरातील टेकडी भागातील रहिवासी असलेल्या राजेश भैनवाल (21) या आरोपीने शेजारील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. पण, आरोपीने पीडिता आणि तिच्या आई-वडिलांना धाक दाखवून हा गंभीर प्रकार लपवून ठेवला. याबाबतची माहिती शेजारील नागरिकांनी मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. दरम्यान, पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version