Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चंद्रकांत पाटील यांनीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत जायला काय हरकत : खडसे

जळगाव (प्रतिनिधी) चंद्रकांतदादा विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपत आले, तर ते अधिक सीनियर आहेत. त्यांनी आपले अध्यक्षपद सोडून मार्गदर्शनाचे काम केले, तर अधिक बरं होईल. त्यांनी मार्गदर्शन करायला काय हरकत आहे? मी तर इतके वर्ष मी मार्गदर्शनच करत आलो, अजूनही करत राहीन, असा टोला एकनाथ खडसेंनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

 

खडसे पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रातील जी पदं आमच्याकडे आहेत त्याचा पक्षाशी संबंध नाही आणि तरीही घराणेशाहीचा निकष लावायचा झाला तर भाजपचे नेते रावसाहेब दानवे हे सध्या मंत्री आहेत. त्यांचा मुलगा आमदार आहे. विखे पितापुत्र आमदार-खासदार असल्याचे प्रतिउत्तरही खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले. चंद्रकांत पाटलांना भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण कार्यकर्त्यांची माहिती नाही. ते दुसरीकडून माहिती घेऊन बोलत आहेत चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत आहेत. त्यांना काय माहिती भारतीय जनता पार्टीमध्ये किती खस्ता खाल्ल्या?. दुसरीकडे मला तिकीट नाकारण्याशी घराणेशाहीचा अजिबात संबंध नाही. माझ्या मुलीसाठी मी कधीही तिकीट मागितले नव्हते. माझे तिकीट कापून बळजबरीने ते मुलीला दिले गेले. माझ्या कुटुंबात केवळ एक जण खासदार आहे. कालपर्यंत मी निवडून यायचो. या पलीकडे तिसरे कोण आहे?, असा सवाल त्यांनी केला.

Exit mobile version