Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सावदा येथे त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन व  चपलांचा हार घालून निषेध करण्यात आला.

 

चंद्रकांत पाटील यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्य केल्याने त्यांच्यावर तात्काळ सुधारित ॲट्रॉसिटी नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.  निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत अतिशय निंदनीय असे बेताल वक्तव्य करून बहुजन समाजाच्या भावना दुखणारे विधान करून कायद्याची पायमल्ली केली आहे. त्यांच्या या  बेजबाबदार विधानामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होऊन तणावाची वातावरण निर्माण होऊ शकते म्हणून, आपणास या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सर्व बहुजन विचारधारेला मांनणारे  नालायक आमदार चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करतो. तसेच त्यांनी केलेल्या बेकायदेशीर विधानमुळे त्यांची तात्काळ त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी सावदा येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी रमाकांत तायडे, अनोमदर्शी तायडे (सर), प्रदीप तायडे, पंकज पाटील, खुशाल निकम, युवराज लोखंडे, नाना संन्यास, गजू लोखंडे सर, उमेश बडगे, गणेश तायडे, वाघराज तायडे, वेडू लोखंडे, सदू भालेराव  टारझन तायडे,यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version