Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चंद्रकांत पाटलांच्या हकालपट्टीची ब्राह्मण महासंघाची मागणी

चिंचवड ( पुणे ) : वृत्तसंस्था । ब्राह्मण समाजाबद्दल अपमानास्पद टिपणी करणा-या चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन भारतीय जनता पक्षाने हकालपट्टी करावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.

गोविंद कुलकर्णी यांनी पत्रकात म्हटले आहे की, कणकवली येथे गुरुवारी झालेल्या सभेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण द्वेषाचे गरळ ओकले आहे. मुस्लिम बाबराचे नव्हे तर दाते, गोडसे, गाडगीळांचे वंशजच आहेत, अशी अपमानास्पद टिप्पणी करून ब्राह्मण समाजाबद्दल असलेल्या मानसिकतेचे प्रर्दशन केले आहे.

अपमानास्पद टिप्पणी करणा-या चंद्रकांत पाटील यांना आता ब्राह्मण समाज अद्दल घडवणार आहे. भाजपने पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी. भाजपने ब्राह्मणानां गृहीत धरण्याची भूमिका या पुढेही सुरू ठेवल्यास पक्षालाही अद्दल घडविण्यात येईल, असा इशाराही पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

Exit mobile version