चंदनाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बोढरा नियतक्षेत्र परिसरातून विनापरवाना चंदनाची तस्करी करणाऱ्या दोन जणांवर वनविभागाच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ किलो वजनाचे चंदनाचे लाकूड हस्तगत करण्यात आली आहे. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे.

सलमान खॉ. अबरार खॉ पठाण (वय-३२) आणि शाबीर खॉ अजमेर खॉ पठाण (वय-२४) दोन्ही राहणार कुंजखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील बोढरा येथील वनपाल व वनरक्षक हे बोढरा जंगली गस्तीवर असतांना दोन जण जातांना आढळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असतांन त्यांच्या जवळील पिशवीत ५ किलो १५० ग्रॅम वजाने चंदनाचे लाकूड, लोखंडी कुऱ्हाड, लहान लोखंडी करवत आणि दोन मोबाईल दिसून आले. त्यांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हा प्रकार घडल्यानंतर दोघांना वन पथकाने अटक केली. तर सोबत असलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सलमान खॉ. अबरार खॉ पठाण (वय-३२) आणि शाबीर खॉ अजमेर खॉ पठाण (वय-२४) दोन्ही राहणार कुंजखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे असून बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयात दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी केली कारवाई
वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक अजय महिरे, अमित पाटील, रहिम तडवी, प्रसाद कुळकर्णी, अशोक मोरे, उमेश सोनवणे, बापू अगोणे, लालचंद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी कारवाई केली. पुढील तपास वनपाल डी.के. जाधव करीत आहे.

Protected Content