Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घुसखोरीमुळे पश्चिम बंगालमधील परिस्थिती बिघडेल — अमित शाह

 

कोलकाता : वृत्तसंस्था । आपण बंगालमध्ये घुसखोरी का थांबवू शकत नाही? घुसखोर आमच्या नोकऱ्या बळकावत गरीबांचं धान्य पळवून नेत आहेत. बंगालमध्ये हीच परिस्थिती राहिली तर स्थिती खराब होईल. याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील’, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं.

 

देशात कोरोनाचा प्रकोप असताना निवडणुकांसाठी नेत्यांच्या प्रचारसभा होत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या प्रचारसभेत ममता सरकारवर हल्लाबोल केला. भाजपा बंगाल काबिज करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं असून, ममतांच्या तृणमूलला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

 

 

 

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. ‘देशात एक पर्यटक नेता आहे. मतदानाच्या चार टप्प्यात राहुल बाबा कुठेही दिसले नाही. राहुल गांधी यांनी एक सभा घेतली आणि भाजपाच्या डीएनएबद्दल बोलले. आमच्या डीएनएत विकास, राष्ट्रवाद आणि आत्मनिर्भर भारत आहे, हे लक्षात ठेवा’, अशी टीका त्यांनी केली.

Exit mobile version