Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घाबरू नका…पण जागरूक रहा ! – जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जळगावात कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण आढळून आला असला तरी जनतेने घाबरून जाण्याची गरज नसून संचारबंदीचे पुरेपूर पालन करत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

आज रात्री आठच्या सुमारास काल सँपल पाठविलेल्या एका रूग्णाचा कोव्हीड-१९ या विषाणूच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक तर्क-वितर्क करण्यात येत आहेत. यावरून सोशल मीडियात देखील अनेक प्रकारची उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून जनतेने घाबरून जाण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन केले आहे.

हे देखील वाचा : शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या रूग्णाची पॉझिटीव्ह चाचणी आली असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जावू नये आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी शक्यतो होम डिलीव्हरीचा वापर करावा. या कालावधीत संयमदेखील खूप आवश्यक आहे. प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत असताना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यामुळे कोणीही लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे जिल्हाधिकार्‍यांनी यात म्हटले आहे.

हे देखील वाचा : कोरोनाची एंट्री : आता जळगावकरांची खरी परीक्षा !

Exit mobile version