घरासमोरून पाण्याच्या मोटारीची चोरट्यांनी केली चोरी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सूनसगाव येथील एकाच्या घरासमोरून १० हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची घटना समोर आली आहे. याबाबत बुधवारी ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरुण सिताराम पाटील (वय-६८, रा. सूनसगाव ता. जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० जानेवारी रोजी रात्री ९ ते ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर ठेवलेली १० हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून येण्याचे उघडकीला आले आहे. या संदर्भात अरुण पाटील यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु पाण्याची मोटारीची कुठलीही माहिती न मिळाल्याने अखेर बुधवार ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहे.

Protected Content