Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सुभाषवाडी परिसरात घरासमोर उभी दुचाकी लांबविल्याप्रकरणी मंगळवार, ४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे रविंद्र सावजी राठोड हे वास्तव्यास आहे, नेहमीप्रमाणे त्यांची एम.एच. १९ सी एच ३०५३ या क्रमाकांची दुचाकी घरासमोर अंगणात उभी केली होती. ३० मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंगणात उभी दुचाकी दिसून आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने चार दिवसानंतर रविंद्र राठोड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version