Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील डोणदिगर गावातील एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे, चाळीसगाव तालुक्यातील डोणदिगर येथील १४ वर्षीय मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार २ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गावातील कैलास रघुनाथ पाटील (वय-२२) हा तरुण मुलीच्या घरात घुसून तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात अल्पवयीन मुलीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कैलास रघुनाथ पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहे.

 

Exit mobile version