Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरात कुणीही नसतांना विवाहितेने उचचले टोकाचे पाऊल

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील लाकूडपेठ येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संगिता उमेश मोघे (वय-४०) रा. लाकुडपेठ, शिवाजी नगर, जळगाव असे मृत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगिता उमेश मोघे ह्या विवाहिता पती उमेश भास्कर मोघे यांच्यासह शिवाजी नगरातील लाकूड पेठ येथे दोन मुले व एक मुलगी यांच्यासह वास्तव्याला होत्या. उमेश मोघे हे बळीराम पेठेतील एका खासगी ठिकाणी खासगी नोकरी करतात. घरात सर्व काही ठिक असतांना संगिता मोघे यांनी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. पती उमेश मोघे हे घरी आल्यावर पत्नीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. शेजारचांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल सोनवणे यांनी मृत घोषीत केले. या घटनेबाबत मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती उमेश मोघे, मुलगी यशीता, देवांश आणि माहिर हे दोन मुले असा परिवार आहे.

Exit mobile version