Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घराच्या कंपाऊंडमधून गॅस सिलिंडर लांबविले

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी ।  शहरातील बळीरामपेठ येथे घराच्या कंपाऊंडमधून ठेवलेले गॅस सिलिंडर लांबविल्याची घटना आज समोर आली असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

 

बळीराम पेठ येथे अरताफ अहमद अब्दुल मजिद  (  २१) हे कुटुंबासह वास्तव्यास आहे .त्यांनी त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये भारत गॅस एजन्सीचे एक हजार रुपये किमतीचे सिलिंडर ठेवलेले होते.  २ एप्रिल रोजी रात्री ठेवलेले सिलिंडर दुसर्‍या  दिवशी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गायब असल्याचे दिसून आले. अरताफ मजीत यांनी सर्वत्र शोध घेतला असता सिलिंडर मिळून आले नाही. सायबर नावाच्या मुलाने हे सिलिंडर चोरुन नेल्याचा संशय अरताफ मजीत यांनी व्यक्त केला असून   शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. पुढील तपास   हे कॉ  बशीर तडवी  करीत आहेत  .

Exit mobile version