घराचा बांधकाम करणाऱ्यांनीच पाच लाखांचा साहित्य केला लंपास!

बोदवड, प्रतिनिधी | येथील एका शिक्षकाच्या घराचे बांधकाम करणाऱ्यांनीच पाच लाखांचा साहित्य लंपास केल्यामुळे न्यायालयाने सुनावलेल्या आपल्या निकालात सुजन कंट्रक्शनची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

बोदवड येथील शिक्षक एकनाथ रोहिदास पाटील यांच्या घराच्या बांधकामात फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने सुजन कंट्रक्शन सचिन चव्हाण, सुमेर सिंग पाटील उर्फ सुरज पाटील व कडू सिंग उर्फ भरत आप्पा पाटील यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी आदेश दिले आहेत. एकनाथ रोहिदास पाटील यांच्या रेणुका नगर येथील सर्वे क्रमांक 169 दोन प्लॉट नंबर 42 क्षेत्र 216 स्क्वेअर मीटर पैकी 88 ,59 स्क्वेअर मिटरचा तळ मजला. तसेच 69,21 चा पहिल्या मजल्याचेसंपूर्ण बांधकाम, क्षेत्र 157,08 स्केवर मिटर चे घराच्या बांधकामाचे करारा नुसार ठरले होते. काही दिवस ठरल्याप्रमाणे काम केले. नंतर टाळाटाळ करून ठरलेल्या कालावधीत बांधकाम करून दिले नाही. बांधकामाची मुदत वाढवून देण्याची विनंती ठेकेदाराने केली होती. परंतु संबंधितांनी शब्द न पडता संगनमताने एकनाथ रोहिदास पाटील यांच्या घरातून पाच लाखाच्या जवळपास बांधकाम साहित्य चोरून नेले व परस्पर त्याची विल्हेवाट लावली. एकनाथ पाटील यांची फसवणूक करून धमकी देऊन तुझ्या कडून जे होईल ते करून घे अशी धमकी दिली. याबाबत एकनाथ पाटील यांन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बोदवड यांचे कोर्टात फौजदारी क्रिमिनल अर्ज नंबर 44/2021 प्रमाणे दावा दाखल केला असता सृजन कन्ट्रक्शन सचिन चव्हाण, सुमेर सिंग उर्फ सुरज सिंग पाटील व कडू सिंग उर्फ भरत आप्पा पाटील यांचे विरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के एस खंडारे यांनी 1 जानेवारी 2022 रोजी 156( 3) कलम 420, 379 ,406 ,504 ,506 ,34, एक महिन्याच्या आत चौकशी करण्याचे बोदवड पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत.

 

Protected Content