Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरफोडीच्या प्रयत्नात ‍फिरणार्‍या संशयिताला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यरात्री घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेल्या एकाला जिल्हापेठ पोलीसानी अटक केली आहे. त्याच्यावर राज्यभरासह मध्यप्रदेशात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सलीम सुभान तडवी व होमगार्ड विनोद ठाकूर हे शनिवारी १६ एप्रिल रोजी रात्री अडीच वाजता गस्त घालीत होते. पेट्रोलिंग करीत असतांना स्टेट बँक आँफ इंडीया शिवकॉलनी शाखेच्या बाजुला असलेल्या भगीरथ कॉलनीतील डॉ. पी.डी. पाटील यांच्या घरासमोर एक इसम संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव रुपसिंग नजरू भिल्ल (वय ५० रा.गर्दावाद ता. कोकशी जि. धार मध्य प्रदेश) असे सांगून तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान, सलीम तडवी यांना संशय आल्याने त्यांनी संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १ फुट लांबीची टॉमी, मोठा स्क्रू ड्रायव्हर, एक पोपट पान्हा असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version