Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरगुती गॅस, इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे उद्या आंदोलन

यावल  प्रतिनिधी  ।  केंद्र सरकारने इंधन दरवाढ केली आहे.या इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला  बसत आहे. यासोबतच  केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.  

 

गेल्या दीड वर्षांतल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत, ज्यांचे रोजगार आहेत त्याच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपला खर्च कसा मिळवायचा याचा एक ही समस्या लोकांसमोर आहे. अशा कालखंडात केंद्र सरकार मात्र मूग गिळून बसले आहे. त्यांना कुठलीच संवेदनशीलता राहिलेली नाही. पण आपण आता गप्प बसून चालणार नाही. तुमचा सिलिंडर आमच्या घराच्या सुख-शांतीला आग लावत असेल तर आंदोलन छेडण्याशिवाय तुम्ही आमच्यासमोर पर्यायच ठेवला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड निर्बंधाचे सगळे विहित नियम पालन करुन यावल शहरातील भुसावळ टी पाँईटवर  सोमवार दि ५ जुलै  रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे  आवाहन राष्ट्रवादीचे यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, यावल शहराध्यक्ष करीम मन्यार , युवकचे फैजपुरचे शहराध्यक्ष विनोद कोल्हे , युवकचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे यांनी केले आहे.

 

Exit mobile version