Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरकुल मंजूर असतांना काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कार्यवाही.

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २०१६ ते २०२२ दरम्यान कायमस्वरूपी मंजूरी मिळून अनुदानाचे पहिला हप्ता देखील देण्यात आला आहे. परंतू अद्यापपर्यंत घरकुल काम सुरू न करणाऱ्या ११६ लाभार्थ्यांवर आता फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूवात करण्यात येत आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा पंचायत समिती मधील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन – २०१६ – १७ ते २०२१ – २२ या वर्षात कायमस्वरूपी प्रतिक्षा यादी (प्रपत्र – ब) व प्रपत्र “ड” यादीतील पात्र असलेल्या लाभार्थ्याना निवासी प्रयोजनासाठी घरकुल बांधकामास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव कार्यालयाकडून मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. मंजुरी प्रदान करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरकुल सरू करण्यासाठी अनुदानाचा प्रथम हप्ता देखील देण्यात आलेला आहे. परंतु हप्ता देवुन ५ ते ६ वर्षांचा कालावधी उलटुन देखील पाचोरा तालुक्यातील ६७७ लाभार्थी यांनी घरकुलाचे काम सुरू केलेले नाही. अशा लाभार्थ्यांना वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत व पंचायत समितीस्तरावरून नोटीस बजावुन देखील त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करता, पंचायत समिती पाचोरा कार्यालयाकडून ज्या ग्राम पंचायतीं अंतर्गत जास्त प्रमाणात घरकुलांचे काम सुरू झालेले नाही अशा लाभार्थ्यांच्या समक्ष भेटी घेवुन, त्यांचे अंतिम म्हणने ऐकुण घेवुन, समर्पक उत्तर न देणा-या लाभार्थ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणेकामी तालुकास्तरीय पथक तयार करण्यात येवुन, त्यांचे परिपुर्ण भेटीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सदर पथकाने केलेल्या नियोजनानुसार ग्रामपंचायत नगरदेवळा, लोहारा, पिंपळगाव बु”, कळमसरा, वडगाव खु”. प्र. भ. व लासगाव येथे समक्ष भेटी देवुन, सदरच्या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत घरकुलाचे काम सरू न करणा-या एकुण ११६ लाभार्थ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणेकामीचे पत्र ग्रामसेवक यांच्यामार्फत संबधित पोलिस स्टेशन यांना दिलेले आहे.

Exit mobile version