Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग.स.च्या स्वीकृत संचालकपदी महापौर जयश्री महाजन यांची निवड (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा सरकारी नोकरांची सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी महापौर जयश्रीताई महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग. स. सोसायटी) च्या नवनिर्वाचित संचालकांची आज पहिली सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. ग.स.सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नव्यानेच निवडून आलेल्या संचालकांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडली. बैठकीत संस्थेच्या स्वीकृत संचालक म्हणून महापौर जयश्रीताई सुनील महाजन आणि रामभाऊ पवार यांची निवड करण्यात आली. महापौर जयश्री महाजन या जळगाव शहरातील माध्यमिक शाळेत उपशिक्षिका आहेत. तर रामभाऊ पाटील हे मराठा समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. राम पवार यांची निवड आधीच जाहीर झाली असून आज झालेल्या बैठकीत महापौर जयश्रीताई महाजन यांची निवड करण्यात आली.
ग. स. अध्यक्ष उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत संस्थेच्या विषयसूचीनुसार विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी संचालक रवींद्र सोनवणे, अजबसिंग पाटील, महेश पाटील, भाईदास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश इंगळे, अजय देशमुख, विश्वास पाटील, मंगेश भोईटे, रागिणी चव्हाण, वाल्मिक पाटील उपस्थित होते. तसेच मनपा विरोधी पक्ष नेते सुनीलभाऊ महाजन उपस्थित होते.

 

Exit mobile version