ग.स.सोसायटीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची गुरुवारी निवड

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात जवळपास ३५ हजारांपेक्षा जास्त सदस्य असलेल्या सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीसाठी कारभारी म्हणजेच अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया गुरुवार दि. १२ तारखेला होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले आहे.

 

ग. स. च्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत प्रथमच चुरस पाहायला मिळत आहे. मतमोजणी नंतर तब्बल १० दिवस होऊनही अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडी संदर्भात या तीन ही गटांमध्ये सहमती झालेली नाही. या दोन दिवसात निवडून आलेल्या सदस्यांपैकी महिला प्रतिनिधी प्रतिभा सुर्वे यांना यावेळी अध्यक्षपदाची संधी मिळण्याची चर्चा असून प्रतिस्पर्धी गटातील सदस्यामंध्ये चढाओढ आहे. सहकार, लोकसहकर, लोकमान्य , प्रगती पॅनल, स्वराज्य पॅनल यांच्यात लढत झाली. या लढतीत सहकार गटाने ९ जागांवर, लोकसहकार गटाने ६ तर प्रगती पॅनल ६ विजय संपादन केला. परतू, कोणत्याही पॅनलला सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या बहुमताच्या ११ जागा जिंकता आल्या नाहीत. सहकार ९ जागा जिंकून सत्ता संपादनाच्या जवळ आले आहे. त्यांना दोन जागांसाठी लोकसहकार किंवा प्रगती कडून पाठींबा मिळवावा लागणार आहे. सहकार गटाचे गटनेते उदय पाटील सत्ता संपादन करण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना स्पष्ट केले आहे. सहकार गटाला मोठी तडजोड करून सत्ता स्थापन करावी लागणार आहे. यामुळे गुरुवार दि. १२ मे रोजी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही निवड दुपारी १ वाजता ग.स. सोसायटीच्या मुख्य इमारतीत करण्यात येणार आहे.

Protected Content