Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्राहक संतापले: सकाळपासून वोडाफोनची सुविधा बंद

जळगाव प्रतिनिधी । वोडाफोन टेलीकॉम कंपनीची मोबाईल नेटवर्क कंपनीची सेवा पुर्णपणे ठप्प झाल्यामुळे मोबाईलवर येणारे आणि जाणारे कॉलसह इंटरनेट सुविधा ठप्प झाली आहे.  ग्राहकांसह ऑनलाईन परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुणे येथून ऑपरेट होणाऱ्‍या वोडाफोन सेवेची मशिनरी अती पावसामुळे पाण्यात बुडाल्याचे आज जळगाव येथील खाजामिया चौकातील त्यांच्या आउटलेटमधून सांगण्यात आले. याठिकाणी आज सकाळपासून चौकशीकामी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेपर्यंत तांत्रीक अडचण दुर झाल्यानंतर वोडाफोनची सेवा सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसा फलक दर्शनी भागावर लावण्यात आला आहे.

आज सकाळपासून वोडाफोन नेटवर्क बंद झाल्यामुळे सुरुवातीला अनेक ग्राहकांना हा काय प्रकार आहे हे समजलेच नाही. त्यांनी आपला मोबाईल फोन कित्येक वेळा रिस्टार्ट करुन पाहीला. त्यानंतर विविध क्लुप्त्या करुन पाहिल्या. मात्र ज्यावेळी ग्राहक वोडाफोन सेंटरवर गेले त्यावेळी त्यांना खरा प्रकार काय आहे ? याचा खुलासा झाला. एका विद्यार्थ्याने त्याची ऑनलाइन परीक्षा असल्याची व्यथा मांडली व आपली काही एक चूक नसताना परीक्षेला मुकणार असल्याची भावना व्यक्त केली.

Exit mobile version