Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामसेवक मजीत तडवी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 

यावल : प्रतिनिधी । नावरे ग्रामपंचायतीला स्वच्छता अभीयानात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करून देणारे  राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कारप्राप्त परसाडे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मजीत तडवी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला

 

वाढदिवसानिमित्त मजीत तडवी यांनी परसाडेतील आदीवासी मुला मुलींना आंबे वाटप केले परसाडे ग्रामपंचायतच्या आवारात व  कब्रस्थानमध्ये विविध औषधी वनस्पती वृक्षांचे वृक्षरोपण केले . यावेळी त्यांचे  वडील अरमान तडवी, सरपंच बबीता तडवी , माजी उपसरपंच रमेश साळवे , मोतीराम सोनवणे , हुसैन तडवी , करीम तडवी , बाळासाहेब भालेराव , सुलेमान  तडवी , शब्बीर तडवी, सिताराम सोनवणे , लुकमान तडवी, राजु तडवी यांनी सहभाग नोंदवला

 

परसाडेतील नुतन ७५ हजार जलसाठवण क्षमता असलेल्या जलकुंभाच्या कामास मान्यता मिळाली असुन लवकर या कामास सुरूवात होणार आहे  यामुळे परसाडे गावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागुन गावास मुबलक पाणी उपलब्ध होईल असा विश्वास ग्रामसेवक मजीत  तडवी यांनी व्यक्त केला

 

Exit mobile version