Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामसुरक्षा दलातर्फे महावीर जयंती निमित्त गरजूंना किट वाटप

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील ग्रामसुरक्षा दलातर्फे महावीर जयंतीचे औचित्य साधून गरजूंना भाजीपाला व धान्याचा समावेश असणारे किट वाटप करण्यात आले.

देशात सगळीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सरकारने टाळेबंदी व संचार बंदी लागू केली आहे.त्यामुळे गरीब,विधवा,हातमजुरी करणारे अडचणीत आले आहेत. या अनुषंगाने येथील मुक्ताईनगर ग्राम सुरक्षा दल यानी जैन प्लाझाचे मालक याचेशी संपर्क केला व त्यानी सुध्दा गरीब लोकांना मदतीचा हात पुढे केल्यामुळे शहरातील गरीब होतकरू महिलांना राशन किट व भाजीपाला कीट चे एकुण ३० किट वाटप करण्यात आले

या मध्ये गरजू लोकांना किट वाटप करण्यात आले होते. या वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन प्लाझा चे मालक रमनलाल जैन तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे राज्य प्रचारक दिनेश कदम यांची उपस्थिती होती. तसेच जिल्हा मनियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी व ग्राम सुरक्षा दल चे सचिन जैन,देवा वंजारी,व मुक्ताईनगर ट्राफिक पोलीस मोजेस पवार उपस्थित होते. ग्राम सुरक्षा दल चे सचिन जैन,हकीम चौधरी,दिनेश कदम यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Exit mobile version