Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामसभा घेण्यासाठी तालुका काँग्रेसचे निवेदन

congress nivedan

जळगाव प्रतिनिधी । शहराला लागून असणार्‍या व सावखेडा शिवारात येणार्‍या वाघनगरात ग्रामसभा घ्यावी या मागणीसाठी तालुका काँग्रेस समितीने निवेदन दिले.

सावखेडा ग्रामपंचायतीत येणार्‍या जळगाव शहराला लागून असलेले वाघनगर ही ३० हजार लोकसंख्येची वस्ती आहे. ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर मिळूनही या भागाकडे दुर्लक्ष केले जाते. आजपर्यंत येथे एकही वेळा ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे ग्रामसभा घेण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे गटविकास अधिकार्‍यांकडे करण्यात आली. तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मनोज चौधरी, जमील शेख, भिकन सोनवणे, प्रमोद घुगे, धनराज पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र सोनवणे, मयुर मिस्तरी, आकाश कोळी, सागर केदार, दिनेश पाटील यांनी निवेदन दिले.

Exit mobile version