Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामपंचायत सदस्य महिलेचा विनयभंग; आठ जणांवर गुन्हा दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या घेऊन गेलेल्या ग्रामपंचायत महिला सदस्यांचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिवार १४ मे रोजी रात्री ११ वाजता यावल पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहिता ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ मे २०२२ रोजी १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास पीडित महीला ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या घेवून गेली होती. यावेळी ग्रामपचायतमध्ये हजर असलेले नितीन व्यंकट चौधरी, देविदास हिरामण कोळी, शिपाई धनराज मुरलीधर चौधरी, लिपिक मोहन भिमराव बाविस्कर, विशाल सुधा तायडे, सुभाष बाबुराव तायडे, विजय चंद्रकांत चौधरी, संदेश यशवंत पाटील यांनी पाण्याची समस्या ऐकुन न घेता महीलेची छेडछानी करुन लज्जा उत्पन्न  होईल असे कृत्य करून विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.

Exit mobile version