Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास प्रत्येक सदस्यास ३ लाखांचा निधी देणार- आ. किशोर पाटील (व्हिडीओ)

पाचोरा, प्रतिनीधी । पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतींना माझे जाहिर आवाहन आहे. तसेच ग्रामपंचायत ही बिनविरोध करून गाव विकास करून घ्यावा. या निवडणुकित बिनविरोध निवडून येणार्‍या प्रत्येक सदस्यास ३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहीती आ. किशोर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असुन शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपुर्ण राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढवाव्यात. जेथे स्वबळावर सत्ता येत असेल तर स्वतंत्र लढा मात्र भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून निवडणुक लढवु नये असा सुचना वजा आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतींना माझे जाहिर आवाहन आहे. तसेच ग्रामपंचायत ही बिनविरोध करून गाव विकास करून घ्यावा. या निवडणुकित बिनविरोध निवडुन येणार्‍या प्रती सदस्यास तिन लाख रूपयांचा विकास निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहीती आमदार किशोर पाटील यांनी “शिवालय” शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, संजय पाटील (भडगाव), उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, गणेश पाटील, अॅड. दिनकर देवरे, भडगावचे माजी सभापती विकास पाटील, जे. के. पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रामकृष्ण पाटील, डाॅ.विलास पाटील, जालंदर चित्ते, डॉ. भरत पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरूण पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर व स्विय्य सहाय्यक राजेश पाटील सह पदाधिकारी उपस्थीत होते.

यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, सध्या संपुर्ण महाराष्टात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असुन महाआघाडीच्या नेत्यांनी ही निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढण्याच्या सुचना सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नुकतीच विधान परिषदेची निवडणुक झाली. यात परंपरागत भाजपाला पसंती देणाऱ्या सुज्ञ मतदारांनी नाकारून महाविकास आघाडीला घवघवित यश मिळवुन दिले. केंद्राच्या शेतकरी विरोधी कायद्या विरूध्द संपुर्ण देशातील शेतकरी एकवटुन रस्त्यावर आला आहे. या शेतकरी आंदोलनावर भाजपाचा कुठलाही नेता तोडगा काढण्यास पुढे आलेला नाही. या र्निदयी सरकारला शेतकर्‍यांची दया येत नाही. जे कायदे जनतेच्या हिताआड येत असतील तर त्या कायद्याद बदल करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण तशी परिस्थीती आजही दिसुन येत नाही. कोरोना या महामारीमुळे समाजातील सर्वच स्थर हे बेजार झाले असुन देशासह राज्यातुन भाजपाला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकित मतदार संघाचा विधानसभा सदस्य या नात्याने मी जनतेला जाहिर अवाहन करतो की, त्यांनी गाव विकासाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपली ग्रामपंचायत बिनविरोध करावी. मतदार संघातील ग्रामपंचायती ह्या ७ सदस्य, ९ सदस्य, ११ सदस्य, १७ सदस्य अशा सदस्यांच्या आहेत. अशात प्रत्येक ग्रामपंचायत हा विषय न घेता प्रती बिनविरोध सदस्य असा निकष धरून तीन लाख रूपयांचा विकास निधी बिनविरोध निवडुन आलेल्या त्या – त्या सदस्यांच्या वार्डातील विकासासाठी आमदार फंडातुन तथा इतर हेड खाली मी उपलब्ध करून देणार आहे. तरी या निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती व सदस्य हे बिनविरोध करून गावाच्या विकासाची स्वप्न पुर्ण करावीत असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केले .

 

Exit mobile version