Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांची ५ टक्के निधी; तात्काळ वितरित करण्याची मागणी

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्कांची पाच टक्के निधी तात्काळ वितरण करावे अशी मागणी दिव्यांग सेनेने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेऊन दिव्यांग सेनेचे तालुका अध्यक्ष योगेश उर्फ मुक्या चौधरी , राहुल कोल्हे जळगाव जिल्हा सल्लागार , दिव्यांग सेनेचे तालुका सचिव चेतन तळेले , तालुका उपाध्यक्ष अशोक कोळी व पदाधिकारी तथा सामाजीक कार्यकर्ते विशाल दांडगे यांनी घेवुन शासनाच्या माध्यमातुन गाव पातळीवर मागील काही दिवसापासुन तालुक्यातील विविध ग्रामपंचायती अंतर्गत अपंग व्याक्तीस त्यांच्या हक्काची पाच टक्के अनुसार दिली जाणारी निधी वितरीत करण्यात येते. मात्र निधी दिली जात नसल्याचे कैफियत यावेळी दिव्यांग बांधवांनी गटविकास अधिकारी यांच्या समोर मांडली. सदरची शासनाकडुन मिळणारी आर्थिक मदत मिळत नसल्याने दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने उपासमारीचे प्रसंग ओढवले जात असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांनी या विषयाकडे तात्काळ लक्ष देवुन दिव्यांग नागरीकांच्या समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतांना सांगीतले .

Exit mobile version