Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामपंचायतींसाठी निवडणूक चिन्हांमध्ये संगणकाचा माऊस, पेनड्राईव्ह , मोबाईल चार्जरचा समावेश !

मुंबई : वृत्तसंस्था । राज्य निवडणूक आयोगाने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी तब्बल 190 निवडणूक चिन्हांची यादी जारी केली आहे. यामध्ये प्रथमच संगणकाचा माऊस, पेनड्राईव्ह आणि मोबाईल चार्जरचा समावेश केला आहे .

निवडणुकीमध्ये चांगल्या आणि आकर्षक अशा निवडणूक चिन्हावर प्रत्येक उमेदवाराचा डोळा आहे. चांगले आणि सर्वपरिचित निवडणूक चिन्ह मिळाले, तर मतदारांना मतदान करण्यास सोपे होईल, असा या मागचा उमेदवारांचा उद्देश आहे. 4 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.

. निवडणुकीत हमखास विजय मिळावा, या हेतूने दैनंदिन वापराशी निगडित आणि आकर्षक चिन्हांवर उमेदवारांचा डोळा आहे. 4 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

सध्या गावागावात राजकीय मोर्चेबांधणीला वेग आलाय. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि समर्थक गावांना भेटी देत आहेत. रात्री उशिरापर्यंत गावाच्या चावडीवर गप्पांचा फड रंगू लागला आहे. यावेळी १९० चिन्हांचा पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून एकाच चिन्हाची निवड करावी लागणार आहे.

दरम्यान, निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांकडून चांगलीच तयारी सुरु आहे. निवडणूक चिन्ह घेण्यापासून ते मतदारांनी मतदान करण्यापर्यंत सर्व रणनीती आखली जात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत केवळ ४८ चिन्हांचा समावेश होता. इच्छुक उमेदवार तहसील कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांकडे निवडणूक नियमावली आणि अटींबाबत चर्चा करीत आहेत.

Exit mobile version