Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गौतम नवलखा आयएसआयच्या संपर्कात

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होते त्यांच्यावर सरकार विरोधात बुद्धिजीवींना एकजूट करण्याची जबाबदारी होती असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने केला आहे. एनआयएने पूरक आरोपपत्रात हा दावा केला आहे.

दिल्ली विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर हनी बाबू नक्षली क्षेत्रात विदेशी मीडियाच्या भेटी आयोजित करण्यात मदत करत होते आणि त्यांना आंध्र प्रदेश आणि तेलंगणात प्रतिबंधित दहशतवादी संघटना रिव्होल्यूशनरी डेमोक्रॅटि फ्रंटच्या कामांची जबाबदारी सोपविण्यात आली होती असा दावा एनआयएने केला आहे.

एनआयएने गौतम नवलखा, हनी बाबू, आनंद तेलतुंबडे, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, मिलिंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी या आठ आरोपींविरोधात मुंबईतील एका विशेष एनआयए कोर्टात पुरक आरोपपत्र दाखल केले.

भीमा कोरेगाल गुन्ह्यात गौतम नवलखा यांची भूमिका आणि भागीदारी असल्याचे एनआयएने म्हटले आहे. नवलखा याच्या माओवादी कॅडरसोबत भेटीगाठी होत होत्या असा दावाही एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

हनी बाबू प्रतिबंधित दहशतवादी संघटना मणिपूरच्या कुंगलपाक कंगलेपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (केसीपी) संपर्कात होता आणि जी. एन. साईबाबाच्या निर्देशांनुसार चालत होता, निधी देखील गोळा करत होता असा दावा एनआएने केला आहे. एनआयएने २८ जुलैला बाबूला नोएडा येथील त्याच्या निवासस्थानाहून अटक केली होती. नवलखा यांना १४ एप्रिल या दिवशी आनंद तेलतुंबडे यांच्यासह अटक केली होती.

आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, गोरखे, गायचोर जगताप आणि स्वामी यांनी इतर आरोपी व्यक्तींसोबत माओवादी विचारधारेचा प्रचार केला आणि सरकारविरोधात असहमती निर्माण करून धर्म, जात आणि समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण केले, असे आरोप करण्यात आले आहेत.

Exit mobile version